🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पारनेर तालुक्यातील अळकुटी ते राळेगण थेरपाळ या ३९ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला १६ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी राळेगण थेरपाळ येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
सुजित झावरे पुढे म्हणाले की, अळकुटी गावापासून ते राळेगण थेरपाळ पर्यंतच्या ३९ किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. मी काही ग्रामस्थासमवेत सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत खा.विखे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत खा.सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून आग्रहाची मागणी केली. अखेर खा.विखे यांच्या प्रयत्नाला यश आले असून अळकुटी ते राळेगण या रस्त्यासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
तसेच या भागातील सामान्य माणसाची हा रस्ता व्हावा अशी अनेक वर्षांची मागणी होती. तालुक्यात एकाच वेळेस एवढ्या मोठ्या किलोमीटरच्या रस्त्याला मंजुरी मिळण्याची ही पहिलीच वेळ असून येत्या आठवड्यात खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत रस्त्याचे भूमिपूजन व प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे, असे झावरे म्हणाले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष वसंत चेडे, माजी अध्यक्ष विश्वनाथ कोरडे, बाजार समिती माजी सभापती बापू भापकर, युवा नेते सचिन वराळ पाटील, निवृत्तीआप्पा वरखडे, रवींद्र पाडळकर, सरपंच पंकज कारखिले, उपसरपंच योगेश आढाव, उमेश सोनवणे, निलेश घोडे, अमोल रासकर आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘सुशांतसिंह मुद्द्यामागे केवळ निवडणूक
- स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर भाजपचेच:- महापौर बाबासाहेब वाकळे
- कोरोना काळात सरकारने जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे- अण्णा हजारे
- अहमदनगरमध्ये कोरोनाचा कहर सुरूच; काल दिवसभरात १४ मृत्यूसह ७५६ नवे बाधित
- नगरकरांसाठी शरद पवारांनी पाठविले रेमडीसीवीर इंजेक्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
