Share

मराठा आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा – उदयनराजे

Published On: 

सातारा : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले तरी त्यांना अॅडमिशन मिळत नाही. उलट कमी गुण मिळालेल्यांना अॅडमिशन मिळतं. प्रत्येक विद्यार्थ्याला बुद्धी दिलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा आणि मेरिटवर निवड करा, हे मी अनेकदा सांगितलं आहे, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

मराठा आरक्षण प्रश्नावर पुण्यात 3 ऑक्टोबर रोजी विचारमंथन बैठक होणार आहे. या बैठकीस निमंत्रण देण्यासाठी आमदार विनायक मेटे यांच्यासह इतर नेत्यांनी साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये उदयनराजे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आरक्षण प्रश्नावर चर्चा केली.

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजात प्रचंड संताप आहे. प्रत्येकाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळालं. त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनसुद्धा अॅडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा, असं उदयनराजे म्हणाले.

महत्वाच्या बताया 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!