Share

…तर लॉकडाऊनचा पर्याय आहे, हे विसरून चालणार नाही : बाळासाहेब थोरात

Published On: 

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात आहेत. पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध म्हणजेच मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रविवारी ४९ हजारांहून वर गेल्याने सरकार देखील कडक निर्बंध वा लॉकडाऊन करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली आहे.

राज्यात शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. सध्या राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊन लागू केला नसला तरी येत्या काही दिवसात लॉकडाऊनचा पर्याय असल्याची तंबीही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

‘लॉकडाऊन हा कोणालाच आवडत नाही. परंतु परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात. राज्यात सध्या वीकेंड लॉकडाऊन व कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला आहे. हे नियम काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. हॉटेल्स, बार, रेस्टोरंट बंद राहणार असले तरी कोणाचीही गैरसोय होऊ दिली जाणार नाही. होम डिलिव्हरी व पार्सल नेण्याबाबत सूट देण्यात येईल. जर या नियमांचे पालन केले नाही व परिस्थिती आणखी भयानक झाल्यास लॉकडाउनच पर्याय आहे. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे, हे विसरून चालणार नाही,’ अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!