Share

…तर आयपीएल स्पर्धा ही सय्यद मुश्ताक अली करंडकप्रमाणे भासेल, वृद्धीमान साहाने व्यक्त केले मत

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाच्या पुढील दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र यानंतरही क्रिकेट रसिकांना आयपीएल स्पर्धेचे उर्वरित सामने कधी आणि कुठे होणार याचीच उत्सुकता लागली होती.

सर्व क्रिकेट संघाचे आगामी आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहता आयपीएल स्पर्धेत किती खेळाडू सहभाग नोंदवतील यावर प्रश्नचिन्ह उभे आहे. यावर भारतीय कसोटी संघाचा यष्टिरक्षक वृद्धीमान साहाने एक मोठे विधान केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साहा म्हणाला की, ‘जर आयपीएल स्पर्धेत परदेशी खेळाडूंचा सहभाग नसला तर ही स्पर्धा सय्यद मुश्ताक अली करंडकप्रमाणे वाटेल.’ वृद्धीमान साहा हा आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत असतो.

नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएल स्पर्धेत वृद्धीमान साहाला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर काही दिवसातच त्याने कोरोनावर मात केली. मात्र यानंतर त्याला पुन्हा कोरोनाची लागण झाली होती. मात्र यादरम्यान त्याचा समावेश इंग्लंड दौऱ्यातील संघात करण्यात आला होता. मात्र आता साहाने कोरोनावर मात केली आहे. सध्या साहा मुंबई येथे भारतीय संघासोबत बायोबबलमध्ये आहे. विलगीकरणाच कालावधी पुर्ण झाल्यानंतर भारतीय संघ २ जुन रोजी इंग्लंडला रवाना होईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!