मुंबई : काल उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची गुप्त बैठक पार पडली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीबाबत भाष्य केलं आहे. ‘सरकार मजबूत आहे, चिंता नसावी,’ असं राऊत यांनी म्हंटलं आहे.
मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी.
जय महाराष्ट्र !!@PawarSpeaks @CMOMaharashtra— Sanjay Raut (@rautsanjay61) May 26, 2020
‘मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी,’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा संकटाचा सामना करण्याबाबत राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्याची शक्यता असल्याने तसेच केंद्र सरकारने काही पावले उचलल्यास रणनिती आखण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – शरद पवार यांच्यात बैठक, पुन्हा होणार राजकीय भूकंप?
योगींच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रियंका गांधी कडाडल्या, म्हणाल्या…
रिक्षाचालकाच्या डोक्यावर पडलं फणस, उपचारांसाठी दवाखान्यात गेल्यावर समोर आलं भलतंच
राज्यात रक्ताचा तुटवडा, अभाविप राबविणार राज्यभरात Blood For Nation अभियान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

