Share

योगींच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रियंका गांधी कडाडल्या, म्हणाल्या…

Published On: 

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परराज्यामधून आलेल्या स्थलांतरितांसंदर्भात बोलताना वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले स्थलांतरित करोनाग्रस्त असल्याची माहिती दिली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे.

सोमवारी रात्री ट्विटरच्या माध्यमातून प्रियांका गांधी यांनी योगी यांच्यावर तिखट शब्दात निशाणा साधला. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ‘एकूण स्थलांतरितांचा आकडा पाहता उत्तर प्रदेशमध्ये १० लाख करोनाग्रस्त आहेत का? असा सवाल त्यांनी केला.

‘उत्तर प्रदेश सरकारच्या आकडेवारीनुसार अंदाजे २५ लाख लोकं राज्यात परतले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून आलेले ७५ टक्के”, दिल्लीतून आलेले ५० टक्के आणि इतर राज्यांमधून आलेले २५ टक्के लोकांना करोनाचा लागण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये १० लाख करोनाग्रस्त आहेत असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं आहे का? असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

दरम्यान, पर राज्यामधून आलेल्या लोकांमधील संसर्गाची ही आकडेवारी कुठून आली? खरोखरच असं असेल तर एवढ्या कमी संख्येने चाचण्या का केल्या जात आहेत?, की ही आकडेवारीही उत्तर प्रदेश सरकारच्या इतर आकडेवारीप्रमाणे अयोग्य आणि बेजबाबदारपणाचे उदाहरण आहे? असे अनेक प्रश्न प्रियांका गांधी यांनी उपस्थित केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

रिक्षाचालकाच्या डोक्यावर पडलं फणस, उपचारांसाठी दवाखान्यात गेल्यावर समोर आलं भलतंच

राज्यात रक्ताचा तुटवडा, अभाविप राबविणार राज्यभरात Blood For Nation अभियान

चव्हाण अडकले कोरोनाच्या विळख्यात, ‘या’ मराठी नेत्यांना देखील झाली होती कोरोनाची लागण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!