🕒 1 min read
मुंबई : एकीकडे राज्यात कोरोनाने हाहाकार माजला आहे. तर दुसरीकडे राजकीय वातावरण तापलं आहे. तसेच काल उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची गुप्त बैठक पार पडली.
यामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचा संकटाचा सामना करण्याबाबत राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्याची शक्यता असल्याने तसेच केंद्र सरकारने काही पावले उचलल्यास रणनिती आखण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
या गुप्त भेटीबाबत खा. संजय राऊत म्हणतात…
मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र !!, असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.
मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी.
जय महाराष्ट्र !!@PawarSpeaks @CMOMaharashtra— Sanjay Raut (@rautsanjay61) May 26, 2020
दरम्यान, या बैठकीत फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत हेच उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील आणि केंद्रातील महत्वाच्या राजकिय घडामोडींवर चर्चा झाल्याचं समजतं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
योगींच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रियंका गांधी कडाडल्या, म्हणाल्या…
रिक्षाचालकाच्या डोक्यावर पडलं फणस, उपचारांसाठी दवाखान्यात गेल्यावर समोर आलं भलतंच
राज्यात रक्ताचा तुटवडा, अभाविप राबविणार राज्यभरात Blood For Nation अभियान
चव्हाण अडकले कोरोनाच्या विळख्यात, ‘या’ मराठी नेत्यांना देखील झाली होती कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
