Share

‘एवढा पैसा, फौजफाटा तरी ‘ते’ का घाबरतात ?’; जयंत पाटलांची मोदी सरकार टीका

Published On: 

मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विटरकडून कारवाई करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी काही नेत्यांसोब काँग्रेस पक्षाचे मुख्य ट्विटर अकाऊंटवर देखील ट्विटरने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर काँग्रेससह विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरच एक चारोळी लिहीत उल्लेख न करता मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘त्यांची भीती- तमाम पैसा, दारूगोळा पोलीस-फौज असताना देखील कोणत्या गोष्टीला ते एवढं घाबरतायत ? एका दिवस विना हत्यार आणि गरीब लोक त्यांना घाबरणे बंद होतील याच गोष्टीला ते घाबरतायत,’ असं म्हणत जयंत पाटील यांनी हॅशटॅग ट्विटर असा देखील उल्लेख केला आहे.

ट्विटरचे काय स्पष्टीकरण ?

दिल्लीतील नांगल येथील एका मुलीवर बलात्कार झाला होता. या पीडित कुटुंबियांची कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेऊन त्यानंतर त्यांनी पीडितेच्या आई-वडिलांसोबतचा फोटो ट्वीट केला होता. तसेच पीडित कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली होती. या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पीडितेच्या कुटुंबियांसोबत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं होत.

ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले होते की, राहुल गांधी यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी केलेल्या ट्विटमुळे कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन झाले आहे. त्यांनी बलात्कार पीडितेच्या पालकांसह छायाचित्र ट्विट केले होते. यामुळे त्यांचे खाते तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!