Share

‘..म्हणून मी ईडीच्या चौकशीला सामोरे जातोय’, अनिल देशमुखांचे खुले पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकवेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले अनिल देशमुखआज सोमवारी ईडी कार्यालयात दाखल झाले. जबाब नोंदवण्यासाठी ते ईडी कार्यालयात दाखल झाले.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा देशमुखांच्या मागे लागल्या आहेत. आज ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी त्यांनी दोन व्हिडीओ ट्विट करून आपलं म्हणणं मांडलं. त्यानंतर त्यांनी एक पत्रंही पोस्ट केलं आहे. हे पत्रं कोणताही मंत्री, नेता, तपास यंत्रणा किंवा जनतेला उद्देशून नाही.

अनिल देशमुखांचे पत्र जसेच्या तसे
मी माझं संपूर्ण आयुष्य लोकांसाठी समर्पित केलं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून मी आयुष्य जगलो आहे. त्यामुळेच माझ्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणतेही आरोप झालेले नाहीत. माझं आयुष्य हे खुल्या पुस्तकासारखं आहे. त्यात काहीच लपवून ठेवलेलं नाही.

पण, माझ्यावर काही लोकांकडून आरोप झाले. ज्यांची काहीच नैतिकता किंवा विश्वासहार्यता नाही अशा लोकांनी माझ्यावर आरोप केले. काही तरी हितसंबंधातून जाणीवपूर्वक हे आरोप करण्यात आलेत. हे सर्व आरोप खोटे आहेत. ज्या व्यक्तीने हे आरोप केला, तोच कर्तव्यावर असताना खंडणी वसूल करायचा. फ्रॉड करायचा आणि खुनाच्या गुन्ह्यातही असल्याचे दिसून येतंय. तर माझ्यावर आरोप करणारा मुंबईचा माजी पोलीस आयुक्तच एका प्रकरणात फरार आहे.

भारतीय नागरिक म्हणून मी नेहमीच संविधानाचं पालन केलं आहे. संविधानाच्या अनुच्छेद २१ चा मी नेहमीच आदर केला आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयात माझी याचिका सुनावणीसाठी असतानाही त्यापूर्वीच मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. मला सुप्रीम कोर्टाने अंतरिम दिलासा दिलेला आहे. माझी चौकशी सुरू असताना माझा वकील माझ्यासोबत राहील. वकिलाच्या समक्षच माझे म्हणणे नोंदवले जाईल, तसेच जर गरज असेल तर मला अटकपूर्व जामीन देण्याचेही कोर्टाने म्हटले आहे.

माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. यात कुणाचे तरी वेस्टेड इंट्रेस्ट आहेत. परंतू, या सर्वांकडे दुर्लक्ष करून ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. माझ्याविरोधात सुरू असलेला प्रचार निराधार आहे. माझ्यावर झालेले आरोप हे निराधार आहेत. हे मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. माझी चौकशी अत्यंत निष्पक्षपातीपणे होईल अशी आशा आहे. मी चौकशीला संपूर्णपणे सहकार्य करेन, असेही त्यांनी सांगितले आहे. पत्राचा शेवट त्यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणून केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!