नवी दिल्ली : ग्रेटा थनबर्ग टूलकिटप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बंगळुरूतून कार्यकर्ती दिशाच्या रवीच्या रूपाने पहिली अटक केली. दिशाला कोर्टापुढे हजर केल्यानंतर तिची 5 दिवसांच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या महिन्याच्या 4 तारखेला दिल्ली पोलिसांनी टूलकिटसंदर्भात गुन्हा दाखल केला होता. दिशा रवीने शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट संपादित केली आणि त्यात काही गोष्टी जोडून ती पुढे पाठवल्याचा आरोप आहे.
पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी या तरुणीला अटक करण्यात आली असून. टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी आता तपासादरम्यान नवनवीन माहिती समोर येत आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी एक मोठा दावा केला आहे. पोलिसांनी दिशा रवीच्या सांगण्यावरूनच ग्रेटा थनबर्गने ट्विटरवरून आपलं ट्वीट हटवलं होते. एवढचं नाही तर ग्रेटाचे संपादित ट्वीटही दिशा रवीनेच एडीट केलं होतं असं म्हटलं आहे. तसेच बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यामुळे दिशा रवीने ग्रेटाला आपलं ट्वीट हटवण्यास सांगितलं होतं. कारण त्यातील दस्तावेजात दिशाचंही नाव असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.
ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत एक ट्वीट केलं होतं. या ट्वीट सोबत तिने टूलकिटही ( दस्तावेज ) शेअर केलं. यावरून मोठा वाद झाल्यानंतर तिने हे ट्वीट हटवले. काही वेळानंतर तिने त्याच टूलकिटची (दस्तऐवज) संपादित आवृत्ती ट्वीट केली. आधीची टूलकिट जुनी आहे. यामुळे ती हटविली गेली आहे असं तिने म्हटलं. ग्रेटा थनबर्गने दिशा रवीच्या विनंतीवरून आपलं ट्वीट हटवलं होतं आणि नंतर दस्तऐवजाची संपादित आवृत्ती शेअर केली होती, जी स्वतः दिशाने संपादित केली होती असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एमएस धोनी चित्रपटात सुशांत सोबत काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्याने संपवलं जीवन
- तरूण उद्योजक बेपत्ता; घरी सोडली आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी
- भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वृध्द ठार; बायपासवरील निशांत पार्कसमोरील घटना
- मागितले होते काय अन मिळाले काय? आकृतीबंधावरुन औरंगाबाद पालिकेची घोर निराशा
- टूलकिट प्रकरणाचे महाराष्ट्रात देखील धागेदोरे; बीडमधला संशयित फरार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
