🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : ‘तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेलं हे ऑटो रिक्षा सरकार आहे. रिक्षा कितीही चांगली असली तरी तिला वेगमर्यादा असतात. या सरकारमध्ये अंतर्गत विरोध खूप आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने हे सरकार कितपत चालेल हे आता सांगता येत नाही,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार केली होती.
याचाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सामनाच्या रोखठोक या सदरात राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राऊत यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्षे चालेल, कारण सरकार चालविणाऱ्या प्रमुख नेत्यांकडे दिलदारी आहे, असे ते म्हणाले. हे सरकार 5 वर्षे तेच टिकवतील. निश्चिंत राहा, असे ते म्हणाले.
दरम्यान, ‘शरद पवार निश्चिंत आहेत, तोपर्यंत सरकार स्थिर आहे. महाराष्ट्र निश्चिंत आहे. हे सरकार टिकवायचेच या एका निर्धाराने शरद पवार उभे आहेत. त्यामुळे, काळजी नसावी, असा टोला राऊत यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206056561287692288?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206050933097947136?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
