Share

…त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात असंतोष- पंकजा मुंडे

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीसाठी माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या होत्या. बैठकीनंतर पंकजांनी माध्यमांशी संवाद साधत रद्द झालेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले.

यासंदर्भात बोलतांना त्या म्हणाल्या की,’महाराष्ट्रात ओबीसींना मिळालेले आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा वर जात होते. ५० टक्क्यांवरील आरक्षण रद्द होईल अशी अपेक्षा असताना सर्वत आरक्षण रद्द झाले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ओबीसींमध्ये तीव्र संताप आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षण दिले होते ते सुद्धा रद्द झाले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात असंतोष आहे. इतर राज्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घेतले आहेत. तसेच विधानसभेच्या पातळीवर काही बदल करता येतात ते करायला पाहिजेत,’ असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, पुढे बोलत असतांना राज्यातला सहकार डबघाईला आला आहे. शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. नुकसानातील भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या भल्यासाठी निर्णय घेतला पाहिजे. सहकार क्षेत्र आज अडचणीत आहे. निवडणुकांसाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी कारखाना सुरु राहिला पाहिजे. त्या दृष्टीने आजची फडणवीस-शहा भेट महत्त्वाची आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातोय, हे वक्तव्य मला योग्य वाटत नाही. साखर उद्योग जगवण्यासाठी सरकारने पॅकेज दिले पाहिजे. साखऱ उद्योगावरील कर्जाचा डोंगर कमी करताना करकपात झाली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!