Share

…म्हणून अनिल परबांनी पोलीस आयुक्तांना फोन करून सूचना दिल्या ; अजितदादांनी दिले स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. सेना-भाजपच्या नेत्यांमध्ये टीकांचे धारदार बाण एकमेकांवर सोडले जात आहेत.

नारायण राणेंना पोलिसांनी अटक देखील केली होती. तर राणेंची अटक ही पोलिसांवर दबाव टाकून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. मंत्री अनिल परब यांनी एसपींना फोनवरून निर्देश दिल्याचं सांगितले जात आहे. एक पत्रकार परिषद सुरु असताना परब फोनवर बोलत होते. त्यावेळी झालेला संवाद हा मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. ऑर्डर कसली मागत आहेत ते, हायकोर्ट आणि सेशन्स कोर्टाने जमीन नाकारला आहे.हायकोर्ट कॉन्फिडन्समध्ये येणार नाही.पोलीस फोर्स वापरून करा ते… वेळ लागेल … कोर्टबाजी चालूच राहील त्यांची असं परब बोलताना दिसत आहेत.

दरम्यान यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ‘परब हे पालकमंत्री आहेत. जिल्ह्यातील एखाद्या घटनेची सूचना पोलीस आयुक्त फोन करून देत असतात. ती एक पद्धत आहे. परब यांना देखील त्याच पद्धतीने फोन करून सूचना देण्यात आली असेल.’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!