औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथील कुणाल कृष्णा काळे या ५ वर्षीय बालकाला सर्पदंश झाला. त्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. दरम्यान, खराब रस्त्यांमुळे उपचारासाठी दवाखान्यात जाण्यास विलंब झाल्याने काळे कुटूंबाने आपल्या एकुलत्या एक मुलाला गमवल्याच्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या शाळा बंद असल्यामुळे आपल्या आईवडिलांसोबत कुणाल शेतात गेला होता. तिथे खेळत असताना कुणाला विषारी सापाने दंश केला. कुणाला रडताना बघून त्याच्या आईने तात्काळ धाव घेतली. मात्र आईच्या डोळ्यासमोरच सापाने पुन्हा एकदा कुणाला दंश केला. शेतात काम करीत असलेले गजानन काळे यांनी तात्काळ कुणालला आपल्या वाहनात बसविले. उपचारासाठी ते अजिंठा येथील शासकीय रुग्णालयाच्या दिशेने निघाले. मात्र खुपटा ते जळकीबाजार या ५ किलोमीटर रस्त्याच्या बिकट दुरावस्थेमुळे त्यांना दवाखान्यात पोहचण्यास उशीर झाला. तर रस्त्यातच कुणालची प्राणज्योत मावळली अशा प्रकारे खराब रस्त्यामुळे पुन्हा एक बळी या परिसरात गेला आहे.
या आधी ही खराब रस्त्यामुळे एक गरोदर मातेला रस्त्यातच प्रसूतीची वेळ आल्याने आपल्या बाळास मुकावे लागले होते. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जळकीबाजार खुपटा येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या घटनेनंतर मात्र नागरिकांनामधून संताप व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा राणेंनी काय प्रतिक्रिया दिली होती ते आठवावं’
- राणेंची मंत्रिपदी वर्णी लागल्याने शिवसेना-भाजपच्या युतीची शक्यता अधिक धूसर ? फडणवीस म्हणाले…
- काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा, हिजबुलचा टॉप कमांडर ठार
- पैठण गेट येथे पाच मजली पार्किंगची भव्यदिव्य इमारत उभारणार
- विरोधकांवर भारी ठरला दानवेंचा ‘चकवा’, रेल्वे राज्यमंत्री पदी मिळवली बढती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

