🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आपल्या देशात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे दोन लाख घटना घडतात आणि त्यात सुमारे पंधरा हजार व्यक्ती दगावतत. याचे प्रमाण पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात आढळते. पावसाळ्यात सर्वत्र गर्द हिरवीगार वनराई उगवलेली असतात. यावेळी बरेच जण ट्रेकिंग किंवा सहलीला जाण्याचा आनंद घेतात. अशा दिवसांत सरपटणारे प्राणी दाट हिरवळीत लपून बसण्याची शक्यता असते. यावेळी सर्पदंशाचा धोका जास्त असतो.
याच पार्श्वभूमीवर सर्पदंश झाला तर आपण त्याची लक्षणे आणि चिन्हे नेमकी ओळखायची कशी या विषयी माहिती जाणून घेऊ या. सर्पविषाच्या इतर परिणामांचे स्वरूप हे सापाच्या जातीवर अवलंबून असते. किती विष शरीरात टोचले गेले आहे यावर परिणाम किती वेळाने व वेगाने होतात ते अवलंबून असते. तसेच काही लोक तर केवळ भीतीपोटी दगावल्याची उदाहरणे आहेत.
याच प्रमाणे चावलेला साप बिनविषारी असेल तर चावलेल्या ठिकाणी दातांच्या खुणा अर्धवर्तुळाकार रचनेत असतात. मात्र एक किंवा दोन दातांच्या खुणा असतील तर मात्र विषारी असण्याचा संभव असतो. घोणस, फुरसे यांच्या दंशानंतर कमीअधिक वेळात रक्तस्राव चालू होतो.
दंशाच्या जागी वेदना होतात, रक्तस्राव होऊ लागतो, सूज येते, भीतीमुळे घाम येतो. नाग-मण्यार यांच्या तुलनेने मात्र जास्त वेळ लागतो. फुरशाचे विष कमी असल्यामुळे जास्त वेळ लागतो. पण सुमारे दोन तास ते चोवीस तासांपर्यंत कधीही चिन्हे व लक्षणे दिसू लागतात.
महत्वाच्या बातम्या
मी बाळासाहेबांकडे परत गेलो असतो तर उद्धव घर सोडणार होते : नारायण राणे
मी केस फिल्टरच्या पाण्याने धुतले म्हणून वाचलो, बबनराव लोणीकरांचा अजब दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

