अंतराष्ट्रीय : जगात कोरोनाने थैमान घातले असतानाचं युरोपातील स्लोवेनिया देशाने कोरोनावर मात केली आहे. तर तेथील प्रशासनाने देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता नियंत्रणात आला असल्याचं जाहीर केले आहे. तसेच स्लोवेनिया हा युरोपातील पहिला कोरोनामुक्त देश आहे. तर त्या देशाने युरोपीय संघाच्या इतर देशांतील नागरिकांना आपल्या देशात येण्याची परवानगी दिली आहे.
रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांसह अजित पवार यांच्यावरही केलं भाष्य म्हणाले…
स्लोवेनियाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आता इतर युरोपीय संघाच्या इतर देशांतील लोकांना स्लोवेनिया येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांना सात दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येणार नाही. परंतु, ज्या व्यक्ती युरोपीय संघातील सदस्य नाहीत, त्यांना काही दिवसांपर्यंत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर विदेशी नागरिक, ज्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसतील, त्यांना आता देशात येण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
‘मी तुमची सायकल घेत आहे, मला माफ करा’ मजुराचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान काही दिवसांपूर्वीचं स्लोवेनियाच्या प्रशासनाने स्लोवेनियामध्ये महामारी असल्याचं घोषित केलं होत. त्यानंतर प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करून संसर्ग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या प्रयत्नांना मात्र आता यश आले आहे.
विधानपरिषद निवडणूक : भाजपच्या उमेदवाराने गुन्ह्य़ाची माहिती लपवली ? प्रतिज्ञापत्रावरून नवे वादळ
तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला असून सध्या दरदिवशी सातपेक्षा कमी नवीन कोरोनाबाधित रुग्ण समोर येत आहेत. तसेच स्लोवेनियामध्ये जवळपास 20 लाख लोक राहतात. स्लोवेनियामध्ये आतापर्यंत 1464 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यामध्ये 103 लोकांचा मृत्यू झाला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

