Share

राजस्थान विरुद्धच्या आजच्या सामन्यालाही रोहित शर्मा मुकणार?

Published On: 

दुबई- आयपीएलच्या 13 व्या मोसमात आज (25 ऑक्टोबर) डबल हेडर सामने खेळले जाणार आहेत. या डबल हेडरमधीर दुसरा आणि मोसमातील 45 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळण्यात येणार आहे. हा सामना अबुधाबीत शेख झायेद स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे.

या सामन्यापूर्वी मुंबईची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ANIनं दिलेल्या वृत्तानुसार कर्णधार रोहित शर्मा आजच्या सामन्यालाही मुकणार असल्याची चिन्हे आहेत. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. त्यानंतर त्यानं चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेतली होती.

संघव्यवस्थापन रोहितला आजच्या सामन्यातही विश्रांती देण्याच्या तयारीत आहेत आणि बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध रोहित पुन्हा मैदानावर उतरवणार आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौराही लक्षात घेता मॅनेजमेंट रोहितवर अधिक ताण देऊ इच्छित नाही.

दरम्यान, राजस्थान रॉयल्ससाठी आगामी प्रवास खडतर असणार आहे. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे त्यांच्यासाठी कठीण असणार आहे. पण तरीही सर्व लढतींमध्ये विजय मिळवून प्रतिष्ठा त्यांना राखावी लागणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!