मुंबई : राज्यात काल दिवसभरात कोरोना बाधित 187 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या 1761 पोहचली आहे. यापैकी 208 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
याचबरोबर एक दिलासादायक बातमी म्हणजे कल्याण पश्चिम येथील एका 6 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता ते बाळ बरे होऊन आपल्या घरी आले आहे. तसेच टाळ्या,थाळ्या आणि शिट्या वाजवत आसपासच्या सोयायटीमधील नागरिकांनी त्या बाळाचं स्वागत केलं.
दरम्यान, मनसे नगरसेविका कस्तुरी देसाई या देखील तिथे उपस्थित होत्या. बाळाची काळजी घेतली जाईल आणि तपासणीसाठी डॉक्टर सुद्धा वेळोवेळी पाठवले जातील, असे कस्तुरी देसाई यांनी सांगितलं.
देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

