Share

शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्यानेच भाजपासोबत पापाची वाटेकरी- अशोक चव्हाण

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत असून, भाजप आणि शिवसेनेसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपकडून काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित हे उमेदवार देण्यात आले आहेत. शिवसेनेकडून भाजपमधून शिवसेनेमध्ये गेलेले श्रीनिवास वनगा हे उमेदवार आहेत. तर काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार दामोदर शिंगडा हे आहेत. दरम्यान जसजशी निवडणूक जवळ येत आहे तशी प्रचारातली रंगत वाढत असून, आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगतांना दिसत आहे.

शिवसेना सरकारच्या धोरणाशी सहमत नसेल तर मग सत्तेत का आहे? असा सवाल करून शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्यानेच भाजपासोबत पापाची वाटेकरी झाली असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. वसई, विरारवासियांनो कोणाच्या दहशतीला घाबरू नका राज्यात आणि देशात परिवर्तन अटळ आहे. काँग्रेसचेच सरकार येणार आहे. आम्ही ठोकशाहीचा बिमोड करु असे अशोक चव्हाण सभेत बोलतांना म्हणालेत.

वसई, विरार, पालघरच्या लोकांना बुलेट ट्रेनची नाही तर लोकल ट्रेनची गरज आहे. भाजप सरकारला लोकल ट्रेन नीट चालवता येत नाही आणि बुलेट ट्रेनच्या गप्पा मारत आहेत. अगोदर लोकल ट्रेन नीट चालवा असा टोला लगावत आपण दोघे भाऊ मिळून खाऊ अशा पध्दतीने शिवसेना, भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र बसून सत्तेचा लाभ घेत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!