Share

संकेत जायभाये आणखी चार एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत

Published On: 

औरंगाबाद: प्रेमप्रकरणातून संकेत संजय कुलकर्णी (१९, मूळ रा. पाथरी, परभणी) तरुणाचा भररस्त्यावर कारखाली चिरडून खून केल्याप्रकरणी कार चालक आरोपी संकेत प्रल्हाद जायभाये (२३, रा जयभवानी नगर, औरंगाबाद) याचा कोठडीतील मुक्काम आणखी सात दिवस वाढला आहे.

दोघांचेही एकाच मैत्रिणीवर एकतर्फी प्रेम होते त्यातून त्यांच्यात वाद झाला. आणि २३ मार्च रोजी आरोपी सकेत जायभाये याने संकेत कुलकर्णीला भेटायला बोलवून आपल्या कारने त्याच्या दुचाकीला उडवले. त्यात संकेत कुलकर्णी कारखाली चिरडला गेला. उपचारादरम्यान संकेतचा जीव गेला.

आरोपी संकेत जायभायेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे मुकुंदवाडी पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने त्याचे मोबाईल सीमकार्ड गायब केले व त्यांच्या सोबत असलेल्या मित्राचे मोबाईल नंबरही देत नसल्यामुळे तपास करण्यासाठी त्याला चार एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्यात यावे ही विनंती पोलिसांनी केली.  न्यायलयाने पोलिसांची मान्य केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!