🕒 1 min read
मुंबई : अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी निधन झाले. 40 वर्षीय सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या बातमीनंतर सर्वांनाच धक्का बसला. अजूनही सिद्धार्थच्या अचानक जाण्याच्या घटनेवर विश्वास ठेवण कठीण आहे.
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड शेहनाज गिलचीदेखील वाईट अवस्था आहे. सिद्धार्थ-शेहनाजची जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. सिडनाज या नावाने त्या दोघाना ओळखले जायचे. सिद्धार्थ आणि शेहनाजने काही दिवसांपूर्वीच एका म्युजिक व्हिडीओ मध्ये एकत्र काम केल आहे. तो सॉंग लवकरच रिलीज केला जाणार आहे. या सॉंगचं नाव ‘हॅबिट’ असं आहे. हे गाणं श्रेया घोषालचं आहे.
https://www.instagram.com/p/CTeFPo-v1C2/?utm_source=ig_web_copy_link
सिद्धार्थ आणि शेहनाजच्या शेवटच्या म्युजिक व्हिडीओच्या शूटिंगचे फोटो इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये सिद्धार्थ आणि शेहनाज बिचवर दिसून येत आहेत. दरम्यान त्यांच्या या फोटोवर चाहते भावूक प्रतिक्रिया देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर नेटकरी म्हणाला की, ‘गाणं जितकं शूट झालं आहे तितकंच रिलीज करा. आम्हाला एकदा सिद्धार्थ आणि शेहनाज ला पुन्हा एकत्र पाहायचं आहे’.
सिद्धार्थ आणि शेहनाज ही जोडी ‘बिग बॉस १३’च्या घरात या दोघाची चांगलीच चर्चा रंगली होती. ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या मात्र त्याबाबत त्यानी कोणताही खुलासा केला नव्हता. नुकतेच ते दोघे बिग बॉस ओटीटीमध्येही मागील महिन्यात दिसले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाला दिलासा नाहीचं! जावेद अख्तर प्रकरणात होणार कारवाई
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- तालिबान सरकारसाठी चीनने केली ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
