मुंबई : अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर आता वादात सापडला आहे. सिद्धांत कपूर याच्यावर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. बेंगळूरमध्ये झालेल्या एका रेव्ह पार्टीतुन सिद्धांत कपूरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणावर आता सिद्धांतच्या वडिलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी सध्या एकच गोष्ट बोलू शकतो की हे शक्य नाही”. असं एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना शक्ती कपूर म्हणाले.
जाणून घ्या कोण आहे नेमका सिद्धांत कपूर?
सिद्धांत कपूर हा एक अभिनेता आहे. त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये असिस्टंस डायरेक्टर म्हणून देखील काम केले आहे. सिद्धांत शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर यांचा मुलगा आहे. २०१३ मध्ये सिद्धांत कपूरने त्याच्या ऍक्टिंग करिअरला सुरवात केली होती. अभिनय क्षेत्रामध्ये येण्याच्या आगोदर सिद्धांताने डीजे म्हणून करिअरची सुरवात केली होती. सिद्धांताने गायन क्षेत्रात देखील कामगिरी केली आहे.
दरम्यान, एम.जी रोडवरील एका हॉटेलवर ड्रग्जचा वापर होत असल्याने पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी सिद्धांत कपूरला देखील ताब्यात घेतले. ड्रग्ज सेवन केले आहे का नाही हे तपासण्यासाठी काही जणांची ड्रग्जची चाचणी करण्यात आली. यावेळी इतर सहा जणांसोबत सिद्धांत कपूरचा रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आला. सिद्धांत हा रविवारी मुंबईवरून बंगळूरला गेला होता. रात्री उशीर झाल्याने पार्टीदरम्यान ही घटना घडली आहे.
महत्वाच्या बातम्या :


