🕒 1 min read
मुंबई : भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर मोहम्मद शमीला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. त्या सर्व घटनाक्रमावर शमीने पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे. ज्यात त्याने ट्रोल्सला ना खरे क्रिकेट चाहते ना भारतीय असल्याचे म्हटले आहे.
T20 विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध भारताच्या पराभवानंतर, सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंसाठी हजारो द्वेषयुक्त मेसेजचा पूर आला होता, ज्यात शमीच्या Instagram खात्यासह, त्याला देशद्रोही म्हटले गेले आणि त्याने गेम फेकण्यासाठी पैसे घेतल्याचा मोठा आरोपही करण्यात आला होता. शमीने ( Mohmmad shami) नुकत्याच एका मुलाखतीत याबाबत सांगितले. त्याने ट्रोल करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे. यात शमीने आपली देशभक्ती कोणालाही सिद्ध करण्याची गरज नसल्याचेही सांगितले आहे.
ट्रोल्सला निशाण्यावर धरत शमीने सांगितले की “जेव्हा अनोळखी सोशल मीडिया प्रोफाइल असलेले लोक किंवा मोजकेच फॉलोअर्स असलेले लोक एखाद्याकडे बोट दाखवतात तेव्हा त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नसते, त्यांच्यासाठी काहीही धोक्यात नाही कारण ते कोणीही नाहीत… आम्हाला त्यांच्याशी गुंतण्याची गरज नाही. आम्ही काय आहोत हे आम्हाला माहित आहे, आम्हाला भारताचा अर्थ काय आहे हे सांगण्याची गरज नाही कारण आम्ही देशाचे प्रतिनिधित्व करतो आणि देशासाठी लढतो. म्हणून आम्हाला अशा ट्रोलवर बोलून किंवा प्रतिक्रिया देऊन कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज नाही.”
महत्वाच्या बातम्या
- शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला किल्ले फिरणाऱ्या मंडळींनी सांगितला- मोहन भागवत
- कोरोना व्हायरसवर ‘थाली बजाओ’ प्रतिसाद देणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान- राहुल गांधी
- राजांनी मंदिरं बांधली पण त्या मंदिरांवर अधिकार…- मोहन भागवत
- अॅश्टन अगरला धमकी प्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे वक्तव्य; म्हणाले…
- “एका मंदिरासाठी भारतात…”, मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
