Share

कृषी आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यासंदर्भात केंद्र सरकारला माघार घ्यावी लागेल – कानडे

Published On: 

अहमदनगर : राज्यसभेतील प्रचंड गदारोळात वाजवी मतदानाद्वारे ‘शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन करार आणि कृषी सेवा करार विधेयक 2020’ आणि ‘कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020’ ला मंजुरी देण्यात आली. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होणार आहे. यासोबतच केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा देखील बदल करण्यासाठी दुरुस्ती विधेयक आणला आहे या विधेयकांना देशातील अनेक विरोधी पक्षातील राज्य सरकारांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. कृषी विधेयक हे शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याचा आरोप करत सध्या काँग्रेस पक्षाकडून या विधेयकाविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे.

हे विधेयक शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे तसेच कामगारांच्या विधेयकावरून देखील गदारोळ उठला आहे या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर सह्यांची मोहीम उघडण्यात आले आहे या मोहिमेचा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार कानडे म्हणाले की केंद्र शासनाने नुकतेच मंजूर केलेले शेतकरी व कामगार कायद्यामुळे शेतकरी भांडवलदारांच्या दावणीला बांधला जाणार आहे. तर जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यातून अन्नधान्य बद्दल अनेक गोरगरीब भूमिहीन लोकांना भांडवलदार ठरवतील त्या दराने अन्नधान्य विकत घेण्याची वेळ येणार आहे परंतु जनतेपुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागेल असं मत त्यांनी व्यक्त केल.

तर उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आमदार लहू कानडे यांच्या सहकार्याने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शेतकरी व कामगार विरोधी कायद्याला जास्तीत जास्त विरोध करून जनतेच्या तीव्र भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचविणार असल्याचं सांगितलं. हे कायदे सर्वसामान्य शेतकरी आणि कामगार यांच्या विरोधात असल्याने या विरुद्ध अनेक आंदोलने होत आहेत. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे आमदार लहू कानडे युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर उपाध्यक्ष इंधनात पाटील थोरात आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!