Share

बॉलिवूडच्या काळजीत बुडालेले मुख्यमंत्री घराबाहेर पडले हे आशादायी आहे ; शेलारांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने धुमशान माजवल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाताशी आलेल्या सोन्यासारख्या पिकासह शेतातील मातीदेखील वाहून गेल्याने शेतकरी मायबाप हतबल झाले आहेत. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून लवकरात लवकर सरसकट मागणी करावी अशी मागणी देखील केली आहे.

तर, कोरोना काळापासून घरीच असलेल्या मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडून जनतेचं दुःख समजून घ्यावं असा प्रहार केला गेला. विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोलापूर जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करून उत्तर दिलं आहे. तर, आम्ही केलेल्या टीकेमुळेच मुख्यमंत्री घरातून बाहेर पडल्याचा दावा भाजपने केला आहे.

भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार यांनी देखील व्हिडीओद्वारे राज्य सरकारसह उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. ‘बॉलीवुडच्या काळजीमध्ये आकंठ बुडालेले मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी घराबाहेर पडले हेच आशावादी चित्र आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन ते थेट मदत करतील अपेक्षा आहे. ‘ असा टोला शेलारांनी लगावला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपही केले. काही नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापुरात धनादेश देण्यात आले. यावेळी एका वृद्ध शेतकऱ्याने गेल्या ७० वर्षात पाऊस झाला नाही एवढा पाऊस त्या २ दिवसात झाला, सगळं वाहून गेलं, खायला-रहायला देखील काही उरलं नाही अशी हृदयद्रावक व्यथा मुख्यमंत्र्यांकडे मांडली.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!