Share

तब्बल ३२ वर्षानंतर श्रीनगर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याचा जल्लोष

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात काश्मिरी पंडितांनी साजरा केला. विशेष म्हणजे गेल्या ३२ वर्षात प्रथमच अशा प्रकारे उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली आहे.

यावर ‘तब्बल ३२ वर्षानंतर श्रीनगर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. देशाचे विभाजन करणाऱ्या कलम ३७० आणि ३५ अ रद्द झाल्यापासून काश्मीरमध्ये प्रत्येक सण अतिशय उत्साहात साजरा होत आहे. आता खऱ्या अर्थाने एकसंध आणि एकरूप भारत उदयास आला आहे.’ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त काश्मिरी पंडितांनी लाल आणि भगवे ध्वज हातात धरून हंडवारा येथे मिरवणूक काढली. देशात ज्या प्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होते. त्या परंपरेप्रमाणे हा उत्सव येथे साजरा करण्यात आला.

उत्सवात सामील झालेले सामाजिक कार्यकर्ते घ मोही उद्दीन झाब म्हणाले, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण काश्मीरमध्ये तब्बल ३२ वर्षांनंतर उत्साहात प्रथम साजरा झाला. आम्ही तो आमचे बांधव काश्मिरी पंडितांसमवेत साजरा करत असल्याने आनंद वाटला. या माध्यमातून काश्मीरमध्ये पुन्हा बंधु भावाच्या प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!