मुंबई: अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणात अजून एक मोठी कारवाई झाली आहे. सुशांतचा मँनेजर सँम्यूअल मिरांडाला अटक झाली असून त्याचबरोबर रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीलासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने आतापर्यंत चार अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मँनेजर मिरांडा यांचा अंमली पदार्थ विक्रेत्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. शौविकचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे, असं वृत्त एनडीटीव्ही या माध्यमाने दिले आहे.
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार बॉलिवूड तसेच मुंबईतील उच्चभ्रू गांजा विकणाऱ्या अब्बास लखानी,करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसित परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे. शौविक चक्रवर्ती या चौघांच्या संपर्कात होता असं चौकशीतून स्पष्ट झाले आहे.सुशांतसिंग राजपूत प्रकरणी आता दररोज नवनवीन खुलासे आणि धक्कादायक माहिती समोर येत आहेत.सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता पण त्यामुळे काहीच हाती लागत नाहीये म्हणून सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि स्वतः रिया चक्रवर्तीने हे प्रकरण सीबीआय कडे देण्यात यावं अशी भूमिका घेतली होती.
देशात कोरोनाचा विस्फोट घेल्या २४ तासात तब्बल ८० हजारांहून अधिक वाढ
पण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देत ही केस सिबीआयकडे देऊ केलं. मुंबई पोलीस, सीबीआयआणि आता एनसीबी ही सुशांतच्या प्रकरणाचा तपास करणारी तिसरी संस्था आहे. या तिनही संस्थांच्या तपासाला सामोरे जाण्यास तयार आहोत अस रिया चक्रवर्तीचे वकिल सतिश मानेशिंदे यांनी म्हटलं आहे.
राज्यातील आणखी एका मंत्र्याला कोरोना


