Share

निलेश राणे म्हणजे पिसाळलेला श्वान, शिवसेना नेत्याचा घणाघात

Published On: 

सोलापूर प्रतिनिधी:  राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आणि शिवसेनेवर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या भाजप नेते निलेश राणे यांच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक झाली आहे. निलेश राणे यांच्या घराण्याला शिवसेनेनेच ओळख निर्माण करून दिली आहे, मात्र शिवसेनेचे उपकार विसरून ते भाजपच्या नेत्यांना खूश करण्यासाठी एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यागत शिवसेनेवर ते भुंकत असल्याचा घणाघात शिवसेना नेते नागेश वनकळसे यांनी केला आहे.

शिवसेनेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आणि सध्या भाजपचा घरोबा केलेले नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नेहमीच शिवसेनेवर तोंडसुख घेतात. निलेश राणे यांनी तर खालच्या पातळीचे भाषेचा वापर करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात राणे यांच्या विरोधात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रान उठवायला सुरुवात केली आहे. विविध स्तरातील कार्यकर्ते निलेश राणे यांच्या विषयी संतप्त प्रतिक्रिया देत आहे. राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मोहोळचे शिवसेना नेते नागेश वनकळसे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

रिया चक्रवर्तीच्या भावाला अटक, एनसीबीची मोठी कारवाई

ते म्हणाले की, आपले राजकीय अस्तित्व संपण्याची जाणीव निलेश राणे यांना झालेली आहे. दरवेळीच शिवसैनिकांना आडवा करत असल्यामुळे याच्या दुःख त्यांच्या मनात आहे. त्यामुळेच वैफल्यग्रस्त होऊन राणे शिवसेनेवर तोंडसुख घेण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. राणे म्हणजे कोणताच विकासात्मक अजेंडा नसलेल्या शून्य विचारधारेचा अविवेकी माणूस आहेत. या पुढील काळात त्यांनी आपल्या टीकेचा स्तर सुधारावा, नाहीतर शिवसैनिक ठेवणीतल्या अश्या शिव्या देतील की, त्यामुळे निलेश राणे यांच्या कानाचे पडदे फटतील, राणे यांनी नशा उतरल्यावर याचे भान ठेवावे अन्यथा शिवसैनिक गप्प बसणार नसल्याचा इशारा नागेश वनकळसे यांनी दिला आहे.

देशात कोरोनाचा विस्फोट घेल्या २४ तासात तब्बल ८० हजारांहून अधिक वाढ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!