Share

विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा का?- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून(२२ डिसें.) सुरु होत असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. तसेच हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याच्या टीका विरोधकांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी नवी-दिल्लीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना विरोधकांना उत्तर दिले आहे.

यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,’इतर राज्यांमध्ये काय चाललंय ते पहावं लागेल. केंद्राने सूचना दिल्यात. नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनांनुसार अधिवेशन होईल. विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी दिवस वाढवायचे नाहीत, कामाचे दिवस सरकारने ठरवलेत. गोंधळ घालण्यासाठी दिवस देता येणार नाहीत. कामाच्या दिवसात विरोधी पक्षाने त्यांचं काम करावं’, असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil)) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) एक दिवस विदेशात जायचं असेल तर चार्ज द्यावा लागतो. पण तुमचा कोणावर भरोसाचच नाही, ज्याच्यावर विश्वास आहे अशा आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्या, असा खोचक सल्ला दिला होता. यावर प्रत्युत्तर देत राऊत म्हणाले की,’तुमच्या सल्ल्याची गरज नाही, तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही. मुख्यमंत्री सक्षम आहेत, उपमुख्यमंत्री देखील सक्षम आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळ व्यवस्थितपणे काम करतंय हे चंद्रकांत पाटलांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाचं काम करावं.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!