🕒 1 min read
मुंबई – राज्यात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हं आहेत. यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर शहरासाठी नवीन आदेश काढण्यात आले आहेत.
किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे असे आदेश मंत्रालयातून सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना देण्यात आले.
राज्य सरकारने कोरोना रोखण्यासाठी नव्याने काढलेल्या आदेसानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार. दरम्यान,कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे वीकेंड लॉकडाऊनचा आदेश काढणाऱ्या ठाकरे सरकारविरोधात राज्यातील व्यापारी संघटनेने विरोध दर्शविला आहे. मुंबई शॉप रिटेल असोसिएशनने राज्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.
दरम्यान, दुकाने बंद राहिली तर माल सडेल. त्याची भरपाई कोण देणार? जागेचं भाडं आणि कामगारांचे पगार कोण देणार, असा सवाल फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी उपस्थित केला आहे. राज्यात एकूण 13 लाख दुकाने आहेत. यापैकी 4 लाख दुकाने मुंबईत आहेत. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या दुकानांची संख्या अवघी 35 हजार इतकी आहे. त्यामुळे इतर दुकाने बंद राहिल्यास व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे विरेन शहा यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार?
- ‘माझे प्राण माझीच जबाबदारी’ या भूमिकेत नागरिकांनाच शिरावे लागेल’
- ‘बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी ; खेळाडूंसाठी बायो-बबल तयार’
- ‘खराब कामगिरी करीत असताना देखील नेट्समध्ये फलंदाजी सरावास नकार’
- ‘ब्रेक द चेन’ या गोंडस नावाखाली बाजारपेठा बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
