🕒 1 min read
औरंगाबाद : सिल्लोड शहरात पाण्याच्या टाकीवर सुरू असलेले शोले स्टाईल आंदोलन अखेर प्रशासनाकडून त्रिसदस्यीय समिती गठित झाल्यानंतर २८ तासानंतर मागे घेण्यात आले. त्यामुळे या नाट्यावर पडदा पडला आहे.
सिल्लोड नगर पालिकेवर शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांची सत्ता आहे. परंतू, पालिकेने गेल्या काही महिन्यांपासून सफाई कामगारांचे वेतन दिलेले नाही. वेतन मिळत नसल्याने कामगारांसमोर अडचण निर्माण झाली आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकदा मागणी करून, आंदोलनाचा इशारा देऊनही पालिकेने वेतन दिले नाही. त्यामुळे संतप्त होऊन सफाई कामगार शहरातील मुख्य भागात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढले. यावेळी आंदोलकांनी सत्तारांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. वेतन मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल असा इशारा दिला होता.
पाण्याच्या टाकीवर सलग दुसऱ्या दिवशीही शोले स्टाईल आंदोलन सुरु असल्याने सदर आंदोलनाचा पवित्रा पाहता उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार मराठे, नगर परिषद मुख्याधिकारी सय्यद रफीक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यासी प्रत्यक्ष चर्चा केली. कामगारांच्या विविध मागण्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्याने अखेर आंदोलनकर्त्यांकडून आंदोलन मागे घेण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- घोडयावरून येण्यास तयार असलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्याचे पुन्हा एक पत्र, म्हणाला..
- ‘त्या’ एक हजार ३०५ अतिक्रमणांवर बुलडोजर चालवणार-एकनाथ शिंदे
- ‘लाचारी करून मिळालेल्या सत्तेने लाटही येत नाही आणि ती टिकत ही नाही’
- अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतही संभाजीनगरचा नारा; शहराला निधी देण्याचीही केली मागणी
- धक्कादायक! कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही दोघांना कोरोना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
