🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालयातील धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा व्हीडिओ हा व्हायरल झाला होता. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फॅॅक्ट चेक केलं. त्यानंतर हा व्हिडीओ खरा असल्याचं सांगत या घटनेची तक्रार भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे (ICMR) करण्यात आली आहे.
Outraged to see corpses laid beside the sick at Sion Hospital. Why isn’t @mybmc following @WHO-prescribed protocols when disposing of #COVIDー19 corpses?
Public hospital staff are doing their best with limited resources at hand. Mumbai’s administration needs to step up NOW! pic.twitter.com/MURUNsIyfc
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) May 7, 2020
आमदार नितेश राणे आणि मिलिंद देवरा यांनी बुधवारी हा व्हीडिओ ट्विट केला होता. यामध्ये कोरोना रुग्णांच्या वॉर्डमधील धक्कादायक चित्र दिसून आले होते. या वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे. बाजूच्या खाटांवर मृतदेह असताना इतर रुग्णांवर उपचार सुरु होते. काही रुग्णांचे नातेवाईकही वॉर्डमध्ये ये-जा करत होते.
सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे.
प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे ही अत्यंत गंभीर बाब आहे.
मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे.
शासनाने तात्काळ लक्ष घालावे व अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.#CoronaInMumbai— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 7, 2020
या घटनेनंतर भाजप नेत्यांनी राज्य सरकारला चांगलेचं लक्ष्य केले आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही, का असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालावे आणि अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी’ अशी मागणी फडणवीस यांनी केली.
हाच का तुमचा गरिबांना मारण्याचा…गरिबांची क्रुर चेष्टा करण्याचा… हाच का तो तुमचा “सायन पॅटर्न”? pic.twitter.com/rcNowCaJL1
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 7, 2020
तर भाजप नेते आशिष शेलार यांनीही सुनावले आहे. ते म्हणाले की, सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात मृतदेहाच्या बाजुला रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या, सरकारच्या संवेदना मृत झाल्या आहेत का? जगासमोर हाच तुमचा पॅटर्न नेणार का ? मुख्यमंत्री, पालकमंत्री, महोदय, गरिबाची एवढी क्रुर चेष्टा का करता ? ICMR च्या गाईडलाईनला हरताळ फासलं आहे? केंद्रीय पथकाने मुंबईत येऊन जी भिती व्यक्त केली होती त्यावरुन राजकारण केलेत. शेवटी काय झाले महापालिकेचे पितळ उघडे पडलेच ना’ अशी टीकाही शेलार यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
मंत्रालयातील बैठकीला येताना मास्क न घालण्याचे राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले….
शाहू महाराजांच्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी, म्हणाले…
#corona : सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित केले ‘हे’ महत्वाचे मुद्दे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
