मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे जयंत पाटील आदि नेते उपस्थित होते.
या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची माहिती समोर आली आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी लागेल. तर सरकारी आरोग्य यंत्रणांवर ताण येऊ नये यासाठी छोटे दवाखाने सुरु करावे लागतील. तसेच परप्रांतीय मजूर जे बाहेर गेले आहेत, त्यांची तपासणी करुन, नोंदणी करुन पुन्हा महाराष्ट्रात घ्यावं. तर MPSC विद्यार्थ्यांना आपआपल्या घरी पोहोचवावं. अनेक विद्यार्थी आज कुठेनाकुठे अडकले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहचवे आवश्यक आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तर लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
दरम्यान बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मंत्रालयामध्ये पोहचलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मास्क शिवाय दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे बंधनकारक असल्याचे मुंबई महानगरपालिकेने म्हटले होते. मात्र या नियमांचे आज राज यांच्याकडून उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या
परदेशातील भारतीयांना आणण्यासाठी ऑपरेशन ‘समुद्र सेतू’ लाँच, INS जलाश्व मालदीवमध्ये दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

