Share

शाहू महाराजांच्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त नमन करताना विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते म्हणून केला होता. यावरून कोल्हापूरमधील शाहू प्रेमी जनतेनं याचा निषेध केला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली होती.

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ट्विट करत ही मागणी केली होती. याच ट्विटला देवेंद्र फडणवीस यांनी रिट्विट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले की, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.

दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या संपूर्ण प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत,” असं छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भोसले यांनी ही मागणी केली होती. तसेच समाजात विसंगती निर्माण करणाऱ्यांवरही त्यांनी भाष्य केले.

छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे मला कुणीही शिकवण्याची गरज नाही! छत्रपतींविषयी जेव्हा केव्हा एखादं प्रकरण समोर आलं, तेव्हा सर्वात आधी मी भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळी मी पुढे असतो, यापुढेही असेन. शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींसोबत जेव्हा केली गेली, तेव्हा देशात सर्वात आधी मी बोललो होतो. सिंदखेड राजामधील माझ्या चालू भाषणात जेव्हा मला हे कळलं तेव्हा तात्काळ या घटनेचा जाहीर निषेध मी केला होता. केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, तेव्हा मी त्यांना माफी मागायला भाग पाडलं होतं. मग इतरांचं काय घेऊन बसलाय?, असे संभाजीराजे भोसले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

#corona : सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित केले ‘हे’ महत्वाचे मुद्दे

परदेशातील भारतीयांना आणण्यासाठी ऑपरेशन ‘समुद्र सेतू’ लाँच, INS जलाश्व मालदीवमध्ये दाखल

संरक्षण विभाग, रेल्वेशी संबंधित रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यास केंद्राची मान्यता

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!