Share

धक्कादायक : पाकिस्तानच्या इस्लामाबादमधून दोन भारतीय अधिकारी बेपत्ता

Published On: 

नवी दिल्ली – पाकिस्तानमधून दोन भारतीय उच्चायुक्त गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद येथे कार्यरत असलेले भारतीय उच्चायुक्तालयातील दोन अधिकारी अचानक गायब झाले आहेत. गेल्या २ तासांपासून हे अधिकारी कुणाच्याही संपर्कात नाहीत, त्यामुळे भारतीय उच्च आयोगाने पाकिस्तानी अधिकाऱ्यांसमोर यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दोन गुप्तहेरांना भारतीय तपास यंत्रणांनी अटक केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयएसएफचे दोन वाहन चालक ड्युटीसाठी बाहेर गेले होते. मात्र, ते दोघेही इच्छित ठिकाणी पोहचले नाहीत. या वाहन चालकांचे अपहरण झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चालकाचा शोध घेण्यात येत असून दोन जण बेपत्ता झाल्याची माहिती पाकिस्तान सरकारला देण्यात आली आहे.

दरम्यान, इस्लामाबाद येथून यापूर्वीही भारतीय अधिकारी गौरव अहलूवालिया यांना त्रास देण्यात येत असल्याचं समोर आलं होतं. गौरव यांच्या गाडीचा दुचाकीवरुन पाठलाग करण्यात येत होता. त्यानंतर, आज दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गायब होण्याचे वृत्त आले असून भारतीय उच्च आयोगाने पाकिस्तानला याबाबत विचारणा केली आहे.

मोठी बातमी : धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

जनमताचा अनादर करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – कॉंग्रेस

मालेगावचे महापालिका आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!