मालेगाव : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान मांडले आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आतापर्यंत या विषाणूचा अनेकांना संसर्ग झाला आहे. करोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने रेड झोनमध्ये असलेल्या मालेगावमध्ये आज मालेगाव महापालिका आयुक्तांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत आढावा बैठक सुरू असताना त्यांचा तपासणी अहवाल आला. हा अहवाल समजताच आयुक्त बैठकीतून बाहेर पडले. या बैठकीत आरोग्य मंत्र्यांसमवेत, कृषीमंत्री दादा भुसे , लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. मालेगाव पालिकेतील आणखी एक अधिकारी बाधित असल्याचीही माहिती समोर आली आहे.
‘कोरोनाविरोधात लढण्यासाठी शासनाकडून निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही’
मालेगाव शहरात उद्भवलेल्या करोना संकटाचा मुकाबला करताना प्रशासनाची दमछाक होत आहे . महापालिकेचे काही कर्मचारी नेमून दिलेल्या कामावर हजरच होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशाप्रकारे कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली आहे. आतापर्यंत एकूण ४७ जणांवर अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आलेली आहे.
पुण्याने करून दाखवलं ! देशातील पहिला कोरोना टेस्टिंग कीट तयार, कमी वेळात होणार निदान
सलमानच्या ‘प्यार करोना’ या गाण्यावर शाहरुख म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

