Share

धक्कादायक! डेपोत उभ्या बसला गळफास लावून घेत चालकाची आत्महत्या, संपात घेतला होता सहभाग

Published On: 

अहमदनगर : राज्यातील विविध भागात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव बस डेपोत एक धक्कादायक घटना घडली आहे. शेवगाव येथे परिवहन महामंडळाच्या बस चालकाने आज शुक्रवारी (दि.२९) सकाळी साडेसहाच्या सुमारास आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. दिलीप हरिभाऊ काकडे (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकरलेला असल्याने सर्व गाड्या डेपोत आणून उभ्या करण्यात आल्या होत्या. काकडे हेही शेवटची मुक्कामी बस घेऊन आले आणि संपात सहभागी झाले होते. शुक्रवारी सकाळी डेपोत उभ्या असलेल्या बसला (क्र. एम. एच. ४० एन ८८४९) मागील बाजूला दोरीच्या सहाय्याने काकडे गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

काकडे यांच्या सेवानिवृत्तीला चारच वर्षे राहिली होती. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. तालुक्यातील आव्हाने या गावाचे ते रहिवाशी आहेत. त्यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांमागे आर्थिक विवंचनेचे कारण असल्याचे पुढे आले आहे, तेच यामागेही असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात दिलीप सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याची घोषणासुद्धा कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी चालकाच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आतापर्यंत १९ महिन्यांत २६ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात बहुतांश आत्महत्या या आर्थिक विवंचनेतून झाल्या आहेत.

दरम्यान, वाढीव महागाई भत्त्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन गुरुवारी कमालीचे यशस्वी ठरले. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत कामगार संघटनांची बैठक झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई व वाढीव घरभत्ता देण्याचे राज्य सरकारने अखेर मान्य केले. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!