नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कलाकार ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. आता BCCI अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौरव गांगुली बुधवारपासून होम क्वारंटाइन झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
सौरव गांगुली याच्या कुटुंबातील तीन सदस्य काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. गुरुवारी गांगुली कुटुंबातील मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्नेहाशिष गांगुली हे बंगाल क्रिकेट संघटनेच्या सहाय्यक सचिवपदी कार्यरत आहे. त्यांची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. महिनाभर आधी स्नेहाशीष यांची पत्नी आणि सासू-सासरे यांना कोरोनाची लागण झाली होती.
स्नेहाशिष मोमीनपुर येथे वास्तव्यास होते. पण त्यांची पत्नी आणि सासरची मंडळी यांना कोरोनाची लागण झाल्याने ते सौरव गांगुली रहात असलेल्या बेहाला येथील घरात स्थलांतरित झाले होते. पण त्यांना सातत्याने ताप येत असल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. स्नेहाशिष यांना बेले व्यू या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणि आता सौरव गांगुलीसह कुटुंबातील सर्व सदस्य सेफ्ल आयसोलेट झाले आहेत आणि त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. असे बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यानं सांगितले.
शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका; WHO चा इशारा
भारताच्या माजी क्रिकेटपटूला कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

