Share

भारताच्या माजी क्रिकेटपटूला कोरोनाची लागण

Published On: 

🕒 1 min read

लखनौ:  गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. सोबतच बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये अनेक खेळाडूंचा देखील समावेश आहे.

आता भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा याने चेतन चौहान याच्यासंबंधी ट्विट करत माहिती दिली. आकाश हे ट्विटमध्ये म्हणतात, “चेतन चौहान जी हे देखील कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते लवकर बरे व्हावेत हीच सदिच्छा. ही (शनिवारची) रात्र खूपच कठीण आहे. बिग बी आणि चेतन जी… दोघेही लवकर तंदुरूस्त व्हा”,

चेतन चौहान यांच्या कुटुंबीयाची कोरोना चाचणी होणार असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. चौहान यांना लखनौ येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

चेतन चौहान हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिले खेळाडू होते. ज्यांनी शतकाशिवाय २००० पेक्षा जास्त धावांचा टप्पा गाठला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी जबरदस्त होती. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी एक लढवय्या खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला होता. गावस्कर यांच्यासोबत सलामीला खेळताना या दोघांनी ३०२२ धावा केल्या. त्यापैकी दहा वेळा त्यांनी शतकी सलामी दिली. चौहान यांनी आपल्या कारकीर्दीत २०८४ धावा केल्या. तसेच, त्यांनी सात एकदिवसीय सामनेही खेळले. १९९०च्या दशकात चौहान लोकसभेचे खासदार होते. सध्या ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत.

राजभवनातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; तर राज्यपाल क्वारंटाइन!

नोव्हेंबरअखेरपर्यंत कोरोना संपेल, हसन मुश्रीफांचा दावा

सध्याचे मुख्यमंत्री हे घरात बसून केवळ आदेश देण्यात मग्न आहेत- आठवले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!