नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊन मध्ये जात आहेत त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. एकीकडे अनेक देशांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला असताना काही देश मात्र पुन्हा शाळा सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची परिस्थिती अजून गंभीर होईल अशी भीती व्यक्त करत शाळा सुरु करण्यासाठी घाई केली जाऊ नये असं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी शाळांना राजकीय फूटबॉल बनवू नका असा इशाराच दिला आहे. रायन पुढे म्हणाले, एकदा कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाला की सुरक्षितपणे शाळा सुरु करा. अमेरिकेसारख्या देशांमध्ये मर्यादित किंवा भौगोलिक लॉकडाउन केला जावा जेणेकरुन परिस्थिती हाताबाहेर गेलेल्या काही ठराविक भागांमधील संसर्ग रोखण्यात यश मिळेल. असा सल्ला हि त्यांनी दिला आहे.
दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी सांगितले, कोरोनामुळे जगभरात निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाही, जर देशांनी आरोग्याशी संबंधित पूर्वकाळजी घेतली नाही तर महामारी अजून गंभीर रुप धारण करेल असा इशारा दिला आहे. जिनिवा येथे कोरोनासंबंधी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सध्या जगभरात १ कोटी ३२ लाख लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर मृतांची संख्या साडे पाच लाखांच्या पुढे गेली आहे. टेड्रोस यांनी यावेळी रविवारी २ लाख ३० हजार नवे रुग्ण मिळाले असून यामधील ८० टक्के रुग्ण १० देशांमधील असून फक्त दोन देशांमध्ये ५० टक्के रुग्ण मिळाले असल्याचं सांगितलं. अमेरिका आणि ब्राझिलला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेला आहे.
पुण्यात आजपासून कडक लॉकडाऊन, सात हजार पोलिसांचा बंदोबस्त
पुण्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात एकहाती सत्ता असुन देखील भाजप कमी पडत आहे : कॉंग्रेस
भारताच्या माजी क्रिकेटपटूला कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
