Share

धक्कादायक निकाल : ‘बडबोल्या’ भाजप प्रवक्त्याचा लाजीरवाणा पराभव

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना ३५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले आहेत. त्यात भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्या निकालाचा समावेश आहे.

आपल्या आक्रमक शैलीत प्रसारमाध्यमांसमोर भाजपची बाजू मांडणारे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पात्रा हे ओडीसातील पुरी या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. पुरी येथून बीजेडीच्या पिनाकी मिश्रा यांनी पात्रा यांचा ११ हजार ७०० मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पुरी हा बीजेडीच्या पिनाकी मिश्रा यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मिश्रा यांनी पुरी येथून २००९ आणि २०१४ मध्ये एकतर्फी विजय मिळवला होता.

दरम्यान, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही कॉंग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ अमेठीतून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!