Share

धक्कादायक!! सप्तपदी घेण्याआधीच नवरदेवावर झाला गोळीबार

Published On: 

बिहार : विवाह म्हंटल की संपूर्ण परिवारामध्ये आनंदाचे वातावरण असते. घरातील प्रत्येक व्यक्ती या आनंदामध्ये सहभागी असते. मात्र यावेळी जर काही वेगळी घटना घडली की याचा सर्वानाच हदरा बसतो. अशीच एक धक्कादायक घटना बिहार मध्ये घडली आहे. लग्नाच्या दिवशी नवरदेव लग्नमंडपात  सप्तपदी घेण्याआधी नवरदेवावर गोळीबार करण्यात आला आहे. वरात घेऊन नवरा मुलगा हा नवरीकडे आला आणि काही लोकांनी त्याला गोळी मारली. यामध्ये नवरदेव गंभीर जखमी झाला असून मोतिहारीमधील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले आहे.

मुरली गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बाईक वरून आलेल्या आरोपींनी नवरदेवावर गोळीबार केला आणि ते पसार झाले. घटनेने एकच खळबळ उडाली. लग्नमंडपात यामुळे गोंधळ झाला आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

नवरदेवाच्या कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. नवरदेवावर नेमका का गोळीबार करण्यात आला याचा पोलीस शोध घेत असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!