परभणी : जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. येथील अब्दुल रहीम नगर भागातील ४८ वर्षीय जाकेर अहेमद खुर्शीद अहेमद देशमुख या व्यक्तीस त्याच्या राहत्या घरातच लाकडाचे सरण रचून पेटवून देत जाळून ठार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.
या बाबत परभणीतील कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाकेर अहेमद खुर्शीद अहेमद देशमुख यांना राहत्या घरात सरण रचून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटूवन दिले. तसेच मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून त्यात मिठाचा वापर करण्यात आला होता. या बाबत मयताचा भाऊ जुबेर अहेमद खुर्शीद अहेमद देशमुख यांनी पोलिसांना माहिती दिली.
मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात आरोपीविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने बाबत कोतवाली पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारमधील महत्त्वाच्या समितीवर खासदार इम्तियाज जलील यांची फेरनिवड!
- सिंघू बॉर्डरवर हत्या करणारा सरवजीत म्हणतो, “मला अजिबात पश्चाताप होत नाही”
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया

