🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही वर्षात भारताकडून अनेक महिला खेळाडूंनी पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव गाजवले आहे. अशाच एका खेळाडूने एका पोलिस अधिकाऱ्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप लावला आहे. या बद्दल सदर महिला खेळाडूने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
आंतरराष्टीय स्तरावर वेटलिफ्टिंगमध्ये या महिला खेळाडुने भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. सदर पोलिस अधिकाऱ्याने सरकारी नोकरी लावुन देतो असे अमिष दाखवत महिला खेळाडूला हॉटेलमध्ये बोलावले होते. तिथे गेल्यावर तिच्यावर त्या पोलिस अधिकाऱ्याने अत्याचार केला. यानंतर अनेकदा क्रिडा विभागाच्या कोट्यातुन नोकरी मिळवुन देतो म्हणून अनेकदा तिच्यावर अत्याचार केला. तसेच या अधिकाऱ्याने त्या महिलचा अश्लील व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओच्या आधारे त्या अधिकाऱ्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरु केले.
ही घटना पंजाब राज्यातील लुधीयाना येथील आहे. अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळुन अखेर त्या महिला खेळाडूने त्याची पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठीमहिला अधिकारी प्रज्ञा जैन यांची नियुक्ती केली गेली आहे. पोलीस अधिकारी प्रज्ञा जैन या प्रकरणाबाबत बोलताना म्हणाल्या की, ‘आरोपींबाबत अद्यापही पुष्टी झालेली नाही. महिला खेळाडूने लावलेल्या आरोपांबाबत तपास करण्यात येईल. जर या आरोपात तथ्य आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल.’ असे सांगितले. या घटनेबद्दल सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गुणरत्न सदावर्ते मराठाविरोधी, त्यांना भाजपचा पाठिंबा आहे का याचा तपास केला पाहिजे’
- ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मधील पंचरत्न पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
- टी -20 वर्ल्ड कप युएईमध्ये आयोजित केला जाईल ; पीसीबी अध्यक्षाचा दावा
- अमेरिकेने लसीच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले, भारतात लसींचे उत्पादन वाढणार
- शिवराज्यभिषेक दिनी शासकीय कार्यालयात भगवा ध्वज उभारण्यास गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
