🕒 1 min read
गुवाहटी: सध्या कोरोनानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून मंदीचे सावट असले तरी देखील ग्राहकांकडून सणासुदीच्या काळात वाहन खरेदी केली जात आहे. मात्र याच काळामध्ये ग्राहकांची फसवणूक होण्याची एखील दाट शक्यता असते. अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे. ती म्हणजे एक कारचा डिलर एका मोठ्या कंपनीच्या जुन्या गाड्यांना रंगरंगोटी करुन विकत होता.
एका व्यक्तीने या डिलरविरोधात फसवणुकीबाबतची तक्रार परिवहन आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका ग्राहकाकडून तक्रार आल्यानंतर गुवाहाटी येथील पोद्दार कार वर्ल्डच्या शोरूममध्ये छापा मारण्यात आला. छाप्यामध्ये जुन्या गाड्या विकून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे पुरावे सापडले, अशी माहिती जिल्हा परिवहन अधिकारी गौतम दास यांनी दिली.
विशेष म्हणजे मारुती सुझुकी या कार कंपनीची देशाच्या वाहन क्षेत्रातील प्रमुख आणि विश्वासार्ह कंपन्यांमध्ये गणना होते. मात्र मारुती सुझुकीच्या एका अधिकृत डिलरकडूनच अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक सुरू होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता त्या डिलरचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे. आसाममध्ये मारुती सुझुकीच्या एका डिलरचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे. आसामच्या परिवहन विभागाने या डिलरचं ट्रेड लायसन्स रद्द केलं.
छापा पडल्यावर शोरुमच्या अधिकाऱ्यांनी अनावधानाने जुन्या गाडीची विक्री झाल्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं कारण न पटल्याने आसामच्या परिवहन विभागाने संबंधित डिलरचं ट्रेड लायसन्स रद्द केलं. लोकं विश्वास ठेवून शोरुममधून कार खरेदी करतात, पण मारुती सारख्या प्रतिष्ठित कंपनीच्या अधिकृत शोरुममधून जुन्या गाड्यांना रंगरंगोटी करुन नवीन गाडी म्हणून विकल्याचा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर ग्राहकांनी द्खील सावध राहण्याचे गरजेचे असल्याचे या घटने मधून लक्षात घ्यायला हवे.
महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : एक-दोन नव्हे तब्बल चार वेळा होणार JEE Main परीक्षा
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार साडेतीन हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य
- अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी राज्यात शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा करा : भाजपा
- पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, एकही रन न घेता माघारी
- अन्वय नाईक प्रकरण : आरोपपत्राला आव्हान देण्यास अर्णब गोस्वामींना हायकोर्टाची परवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

