Share

धक्कादायक! मृत कोरोना रुग्णाच्या खिशातून पैसे लंपास, आरोपी ताब्यात

Published On: 

जालना: एकीकडे महामारीच्या काळात लोक एकमेकांना मदत करत आहेत, तर दुसरीकडे माणुसकीला काळिमा फासण्याचे कृत्य काही समाज कंटक करीत आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधील मृताच्या खिशातील रोख ४२ हजार रुपये, चांदीची अंगठी, एटीएम, आधार, पॅन व मतदान कार्ड काढून घेत मोबाइलच्या साह्याने फोन पेवरून ६८०० रुपयेसुद्धा लंपास केल्याची घटना १५ एप्रिलला घडली. याप्रकरणी नातेवाईक बुधवारी सकाळी तक्रार नोंदवण्यास गेले असता, कदीम पोलिसांनी तोंडी माहितीवरून आरोपींना ताब्यात घेतले.

मात्र पोलिसांनी गुन्हा नोंद न करता प्रकरण आपसात मिटवा, असे म्हणून नातेवाइकांना बुधवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत ठाण्यात बसवून ठेवले व त्यानंतर घरी पाठवून दिले. यामुळे संतप्त नातेवाइकांनी गुरुवारी सकाळी एएसपींकडे दाद मागितली. तेथून आदेश आल्यावर अखेर ५ तासांनंतर कदीम पोलिसांनी फक्त तक्रार घेतली.यातील मृताचे तिसऱ्या दिवशीचे विधी पार पडल्यानंतर त्यांचा मोबाइल पाहिल्यावर त्यातील फोन पेच्या माध्यमातून ६८०० रुपये ऑनलाइन दुसऱ्याच्या खात्यात वळते केल्याचे लक्षात आले.

तसेच खिशातील ४० ते ४२ हजार रुपये व इतर कागदपत्रेही गायब होती. दरम्यान, दु:खातून सावरत नातेवाईक बुधवारी कदीम जालना पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल न करता तोंडी म्हणने ऐकून घेत आरोपींना पकडून आणले. या वेळी आरोपींनी पैसे घेतल्याची कबुली दिल्यावर नातेवाइकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, गुन्हा नोंदवण्याऐवजी प्रकरण मिटवण्याचा सल्ला पोलिस देत होते. तसेच गुरुवारी रात्री ११.३० वाजता पोलिसांनी ठाण्यातून हाकलून दिल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी तक्रारीत केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!