पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. रेमडेसिविर, ऑक्सिजन याचा प्रचंड तुटवडा राज्यात जाणवत आहे. देशात देखील अशीच परिस्थिती आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी सूत्र आपल्या हातात घेण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
‘आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचा शरद पवार यांना उत्तम अनुभव आहे. भूजच्या भूकंपाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती. किल्लारीचं संकट केवळ पवारांमुळंच निभावलं. आता ते आजारी आहेत. त्यामुळं घरात आहे. मात्र त्यांना घरात यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास त्यांचं मार्गदर्शन घेता येईल. त्यांचा एक फोन चित्र पालटू शकतो,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नगरसेविका मंजुषा खर्डेकर यांच्या प्रयत्नातून एसएनडीटी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- सेवानिवृत्त धारकांचे महिन्याच्या पाच तारखेच्या पेन्शन करा- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले
- भाजपचे किती लोकप्रतिनिधी मला भेटतात हे एकदा तपासा, अजितदादांचा चंद्रकांतदादांना टोला
- लहान मुलाच्या भांडणावरून महिलेला मारहाण
- प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- कोहली-पडीक्कलची ही जोडी लई भारी; विक्रमाच्या ‘या’ खास यादीत एंट्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

