विरार : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात तेरा रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. यात पाच महिला तर आठ पुरुषांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत.
विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आज मध्यरात्री ३ ते ३.३० च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्ण उपचार घेत होते. यातील तेरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यानंतर आता आणखी एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे.
या रुग्णालयातील आगीत कुमार दोशी या रुग्णाचा देखील मृत्यू झाला. हा धक्का त्यांच्या पत्नीला सहन झाला नाही. पतीच्या मृत्यूची बातमी समजताच पत्नी चांदनी यांनाही हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा देखील प्राण गेला. त्यामुळे एकाच दिवशी दोषी दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाला असून परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपचे किती लोकप्रतिनिधी मला भेटतात हे एकदा तपासा, अजितदादांचा चंद्रकांतदादांना टोला
- ‘शरद पवारांना आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचा उत्तम अनुभव त्यांचा एक फोन चित्र पालटू शकतो’
- प्रसिद्ध अभिनेता अमित मिस्त्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- राज्याच्या ऑक्सिजन संकटात आता शरद पवार मैदानात; साखर कारखान्यांना लिहिलं पत्र
- ‘पवारसाहेब तुम्ही काही करू नका, नाहीतर तुमचे साखर कारखाने हवेतील ऑक्सिजन पण सोडणार नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

