मुंबई : कोरोनामुळे सर्व क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला असून अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तर कित्येकांना बेरोजगारीशी देखील सामना करावा लागत आहे. यातच, कोट्यवधी चाहते असणाऱ्या आयपीएल (IPL) या टी-२० क्रिकेट प्रकाराच्या मालिकेस देखील तात्काळ पुढे ढकलावे लागले होते. बीसीसीआयतर्फे सप्टेंबरमध्ये हि स्पर्धा खेळवण्यास विचार केला जात आहे.
दरम्यान ,अडसर ठरू शकणाऱ्या टी-२० विश्वचषक यंदाच्या वर्षी रद्द करून पुढे ढकलण्यात आल्यानंतर IPL च्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० आणि ३ वनडे मॅचची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाची टीम इंग्लंडमध्ये १ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या कालावधीमध्ये ३ टी-२० आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे.
‘जर बदल्यांची चौकशी करायची असेल तर मग गेल्या 6 वर्षांत झालेल्या बदल्यांची व्हायला हवी’
तर, आयपीएल सुरु होण्याआधी ३ दिवस हि सिरीज संपणार असली तरी आयपीएलच्या नियमांनुसार ६ दिवस या खेळाडूंना क्वारंटाईन केलं जाणार आहे. अंदाजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे हे खेळाडू १७ किंवा १८ तारखेला यूएईमध्ये पोहोचतील त्यानंतर त्यांना क्वारंटाईन च्या प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे.
महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांची तुलना होऊच शकत नाही महाराष्ट्र पोलीस उत्तमच – फडणवीस
दरम्यान, पहिल्या, तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी या प्रत्येक खेळाडूची कोरोना चाचणी करण्यात येईल, तर सर्व चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बाहेरील जगाशी संपर्क तोडून फक्त टीमच्या संपर्कात येता येईल. त्यामुळे हि सर्व प्रक्रिया बघता ऑस्ट्रेलिया व इंग्लंडच्या खेळाडूंना सुरुवातीचे काही सामने खेळता येणार नसल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे IPL मधील मुंबई व चेन्नई टीम वगळता अन्य संघांना मोठा फटका बसू शकतो.
सुशांत सिंग राजपूत साठी रामदेव बाबांचे हवन…
खालील खेळाडूंविना खेळावे लागतील संघांना सुरुवातीचे काही सामने-
राजस्थान टीम- स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जॉस बटलर
कोलकाता टीम- इओन मॉर्गन आणि पॅट कमिन्स
हैदराबाद टीम- डेव्हिड वॉर्नर
बंगळुरू टीम- एरॉन फिंच
पंजाब टीम- ग्लेन मॅक्सवेल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

