पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून भाजपाने मुंबई पोलिसांच्या तपासावर दबाव आणला जात असून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाच्या तपासावरून राज्य सरकारवर आरोप करत हे प्रकरण सीबीआयकडे सोपावण्याची मागणी केली होती, तर यावरून भाजपाचा मुंबई पोलिसांवर विश्वास नसून राजकारण केले जात असल्याचा दावा सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी करत भाजपाचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.
यावर आता, महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. नगरमध्ये हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी , पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित , नगर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन आदी उपस्थित होते. “देवेंद्र फडणवीसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर त्यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात येत आहे. हे राजकारण आहे. 5 वर्षे ज्यांनी गृहखातं सांभाळलं तेच आपल्या पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत हे दुर्दैव आहे.” अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
‘जर बदल्यांची चौकशी करायची असेल तर मग गेल्या 6 वर्षांत झालेल्या बदल्यांची व्हायला हवी’
यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला बिहार निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडून साहाय्य करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र, सुशांत प्रकरण आणि याचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास आहे. मी पाच वर्ष राज्याच्या पोलिसांबरोबर काम केले. त्यांची क्षमता मला माहिती आहे. मात्र अनेक वेळा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दडपणाखाली काम करु नये, अशी आमची अपेक्षा आहे”, असं फडणवीस म्हणाले.
“सुशांत प्रकरण सीबीआय’कडे पाठवण्याची मागणी झाली. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल. मात्र महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांची तुलना होऊच शकत नाही. महाराष्ट्र पोलीस उत्तमच आहेत”, असं फडणवीस यांनी मत मांडलं.
दुध प्रश्नावर ‘शेतकऱ्यांचे कैवारी’ आणि ‘जाणते राजे’ गप्प का ? विखे पाटलांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

